Monday, January 27, 2014

रसिका तुझ्याचसाठी

स्वीकार हि कविता !!!!!!!!
देवास वंदुनिया मैफिल सुरु होई 
दुर्भाग्य हेचि माझे येउन रिक्त जाई 

व्हावी सदाच धुंद मैफिल हि सुखाची 
घ्यावी शुभेच्छा मात्र एका कवी मनाची

दुग्धात शर्करा ती गोडी अवीट यावी 
हि रात्र रसिकांच्या स्मरणी सदा असावी

हि रात्र चांदण्यांची नाही मला प्रीतीची 
जावेच लागते ना? हि बंधने जगाची ....

सारी सुखात जावी हि रात्र चांदण्यांची 
स्वीकार हि कविता ! रसिका हि तुझ्याचसाठी 

वाट

ढग थांबले माझे तुझी वाट पाहताना !
पाऊसरुपी अश्रू कोसळले तू जवळ नसताना !
का भेटली तू मजला, आयुष्य माझे संपवताना !
दिलास शब्द तू तुझा ,परत मागे फिरताना !
सांभाळले मनाला मी , तू जवळ नसताना !
ढळले अश्रू माझे तुझ्याच आठवणीत रडताना !