स्मृतीपटल
Canvas of Memories
Showing posts with label
मुक्तछंद
.
Show all posts
Showing posts with label
मुक्तछंद
.
Show all posts
Monday, March 12, 2012
शर्यत
एका
अशा
शर्यतीत
भाग
घेतलाय
ज्यात
सहज
जिंकू
शकतो
,
नव्हे
जिंकतोय
-
पण
जिंकणं
हाच
तिथे
पराभव
आहे
.
धावणं
अपरिहार्य
आहे
.
धावतोय
..
जगण्यासाठी
,
अस्तित्वासाठी
...
पराभवासाठी
...
Thursday, November 3, 2011
अनुत्तरीत
सर्व प्रश्न सुटले असं कधीही होत नाही
काही राहतातच अनुत्तरीत
शाळेतल्या परीक्षेतही....
आणि आयुष्यातही.....
Monday, October 24, 2011
शब्द
A friend of mine called me up yesterday and he was apparently very happy as he had realized his long cherished dream....
But somehow words in which he expressed his happiness were not proportional to his happiness...
I knew the background and zeal with which he worked towards dream; so I could read between the words and gauge his feelings....
Why words does not mean what the person is actually trying to convey... why do they betray speaker???
सुखातही
आणि
दुखा
:
तही
पाहिलंय
शब्दांना
साथ
सोडताना
मी
,
तरी
पण
बांधावं
लागतं
उन्मुक्त
भावनांना
या
थिट्या
शब्दांत
कारण
मनाची
भाषा
जगाला
समजत
नाही
Monday, October 17, 2011
अनभिज्ञ
का
लपवल्यास
माझ्यापासून
तुझ्या
अपूर्ण
राहिलेल्या
कविता
,
का
सांगितलं
नाहीस
कधी
मी
मोडलेलं
तुझं
स्वप्न
,
कसं
कळणार
होत
मला
तुझं
धीरगंभीर
मुखवट्यामागे
दडलेलं
हळुवार
मन
..
Tuesday, October 11, 2011
Stale-mate
ठरलं
होतं
न
आपलं
तुला
विसरायचं
,
मग
आता
परत
का
येतेस
...
उगाच
वाकुल्या
दाखवून
कसं
फसवलं
म्हणतेस
बोलावयाचंच
होत
तर
जाऊ
का
दिलंस
परतीचे
रस्ते
बंद
करुन
काय
मिळवलंस
??
टीप: दहा दिवसापूर्वी पर्सिस्टंट सोडली आहे, आणि जेव्हा पासून सोडलीये तेव्हापासून असे वाटतंय की का उगाच सोडली..
मृगजळ
तु
समोर
नसताना
मन
तुझ्या
आठवणीत
रमतं
..
शब्दांचा
खेळ
मांडत
तुझ्याशी
बोलतं
..
मृगजळाच्या
मागे
धावताना
स्वत
:
ला
विसरतं
..
तु
समोर
असताना
मन
हरखून
जातं
..
शंभर
वेळा
उजळणी
केलेल्या
शब्दांनाही
विसरतं
..
मृगजळाच्या
मागे
धावताना
स्वत
:
ला
विसरतं
..
Monday, October 10, 2011
शब्द
शब्द
अव्यक्त
भावनांना
मूर्त
रूप
देणारे
शब्द
..
आनंददायी
शब्द
...
हवेहवेसे
वाटणारे
शब्द
..
डोळ्यांनी
बोलणाऱ्या
प्रेमी
जीवांना
ओझं
वाटणारे
शब्द
...
तर
कधी
दुखावणारे
शब्द
..
आयुष्यभर
टोचणी
लावणारे
शब्द
..
बेहोष
करणारे
शब्द
...
स्फूर्ती
देणारे
शब्द
...
कधी
मनांना
जोडणारे
शब्द
तर
कधी
दुरावा
निर्माण
करणारे
शब्द
..
शब्द...
Thursday, January 13, 2011
अव्यक्त
ओठांवर थांबलेले शब्द
मनात राहिलेल्या भावना
सागराच्या ओढीनं वाहणाऱ्या वेड्या नदीला थांबवणार धरण
पाणावलेले डोळे
कोंडमारा कि मन ?
सर्कॅशीत हसणारा विदुषक
बेदुंध वाहणारा धबधबा का नदीची आत्महत्या?
पराभूत एकाकी आणि अव्यक्त निश्चल कडा आणि त्याचं स्वगत
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)