Showing posts with label marathi blogs. Show all posts
Showing posts with label marathi blogs. Show all posts

Tuesday, March 13, 2012

नावात काय आहे?

रस्त्यात लावलेल्या जाहिराती वाचण्याची माझी जुनीच सवय आहे. गेले कित्येक दिवस मी घर ते ऑफिस प्रवास करताना बांधकाम व्यावसायिकांच्या (बिल्डरच्या) जाहिराती बघतोय. सगळी नावं एकजात इंग्रजी. सगळ्यांना इंग्रजी कुत्रा चावलाय वाटतं. काय ती नावं - Swiss county, Aspiria, Mega Polis, Life Republic, Dynasty, Island, Servillie, Sovereign  - सगळाच मूर्खपणा

 

ज्या इमारतीत पाटील, जोशी, कांबळे, शर्मा, देसाई, रेड्डी, नायडू, सिंग, पटेल, खान, जेकब, जोसेफ या नावांची भारतीय मंडळी राहणार त्यांच्या इमारतीचं नाव काय तर म्हणे Eden paradise. सगळीच बौद्धिक दिवाळखोरीची लक्षणं

इंग्रजी नावांना माझा काही तात्विक विरोध नाहीये, पण शंभर नव्या इमारतींपैकी नव्वदना जर आपण इंग्रजी नावं देत असू, तर हे भारतातलं शहर आहे का इंग्लंडमधलं हा प्रश्न पडतो

 

कंपन्या वैगेरे इंग्रजी नावं ठेवतात ते समजू शकतो एखाद्या वेळेस, कारण त्यांना जगभर आपला धंदा करायचा असतो, पण घरांची नावं, ती पण इंग्रजी. उद्या पोरांची नावं पण Tom, Dick and Harry ठेवतील

देव करो आणि या भारतीय इंग्रजांना सुबुद्धी होवो...!!!

 

(टीप: आणि नाहीच झाली तर मग शिवसेना, मनसे आहेतच!!)

 

Monday, March 5, 2012

शब्दांगण - १

काही शब्दांविषयी.. काही शब्द हट के असतात.. विचार करायला लावतात..अशा काही शब्दांविषयी

कृष्णकृत्य -
कृष्णकृत्य म्हणजे वाईट कृत्य. फसवाफसवीची कामं. कृष्णचरित्र बघितलं तर त्यात अशी फसवाफसवीची कामं आहेत, पण त्यापेक्षा कितीतरी कामं रुढार्थानी आपण ज्याला धर्म म्हणतो अशी आहेत. असं असताना सर्व कपटी कृत्यांना कृष्णकृत्य म्हणून आपण चुकत आहोत असं मला वाटतं
अनुप जलोटाचं ते भजन ऐकलय का "जग में सुन्दर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम" यात दुसरी कुठलीही नाव टाकून बघा तो गोडवा येणं अवघड आहे..तसंच "केशवा, माधव तुझ्या नामात रे गोडवा" बाबत पण म्हणता येईल
कृष्णाच्या छल-कपटामागे असलेला उद्दात दृष्टीकोन सहज लक्षात येणारा नाहीये. म्हणून उगाच हा शब्द वापरताना आपण पूर्ण अर्थ समजून घेतला पाहिजे

मतदान - 
याचा पर्यायी इंग्रजी शब्द आहे - "Voting"
त्यात कुठेही "दानाचा" उल्लेख नाहीये. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये मतदान हा शब्द आहे
मला असं वाटतं की आपण उगीच "दान" म्हणून या कर्तव्याला ऐच्छिक केलंय. दान म्हणले की देणाऱ्याला दातृत्वाचा भाव येतो, आणि तो दान देतोय म्हणजे ते घेणाऱ्यावर उपकार करतोय अशी भावना होण्याची शक्यता आहे, नव्हे बहुतांश वेळा अशी भावना होतेच. पण मतदानाच्या बाबतीत मत"दान" करून आपण स्वत: वर उपकार करत आहोत. निवडून येणारा उमेदवार चांगला नसेल तर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होणार असतो. त्यामुळे ते दान नव्हे. ते कर्तव्य आहे

प्रेमात पडणं - 
याचा पर्यायी इंग्रजी शब्द आहे - Fall in love
आणि हिंदी शब्द आहे - "प्यार हुआ" - "प्यार में गिरा" नसतं हिंदीत!!
आता इंग्रजीच्या "Fall in love" चं मराठीत "प्रेमात पडणं" झालंय असं सरळ सरळ दिसतंय
पण इथे असं नाही वाटत का की "पडणं" (धडपडणं) क्रमप्राप्तच आहे. शब्दातच आहे ते.. :)