Monday, January 27, 2014

पांडुरंग

भक्त आले दर्शनाला पांडुरंगाच्या दरबारी
विटेवरी उभा आता हात ठेउनिया कटेवरी !

पाहुनी सावळे हे रूप झाले भक्तीत सारे दंग
आता गातो फक्त आम्ही संत तुकाचे अभंग !

गेले सर्व भक्त जन नामस्मरणात बुडून
माय चंद्रभागा आता वाहते भरून ।

उत्कंठा भेटीची जास्त ताणू नका देवा
दर्शन द्यावे भक्तांना हेच मागणे आता !

ताई..

ताई..
तुझ्या विदेशी जाण्याने आता खरच 'ताई' यात किती शक्ती आहे हे कळतय… 
 
तुझा मारणं आता पुन्हा अनुभवायचय 
मला तू मारल्यावर पुन्हा खोट खोट रडायचंय
कधी असच तुझ रुसणं मला पुन्हा बघायचंय 
आपल्यात झालेली भांडण मिटवताना,
मला आता खरच माघार घ्यायची आहे 
मला हे सगळा पुन्हा करायचंय ……। 
ये ना ,,,ताई तू ये ना परत 
Miss you !!!

चिन्मय संत