Monday, February 6, 2012

Somewhere.... Everywhere.....Nowhere..

काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय.. काय कळत नाहीये..
नोकरी बदलली
काम बदललं
आजुबाजुचे लोक बदलले.. 
घर पण बदललं.. 
पण काहीच नाही बदललं.. ..
काहीतरी चुकतंय..
एक तारखेला जमा होणाऱ्या पगारात काही हजार जास्त जमा होतायेत.. 
पण.. 
काहीतरी चुकतंय..
काहीतरी खुणावतंय.. 
काय.. ?
नीटसं दिसत नाहीये..
कोणीतरी आहे वाटत तिथे.. ओळखू येत नाहीये.. 
बोलावतोय का तो मला..
हात दाखवतोय वाटत .. हो मला बोलावतोय..
हो आलो...
अरे थांब कुठे निघालास..येतोय मी..
हो आलो...
अरे थांब कुठे निघालास..येतोय मी..
पळू नकोस ... थांब थांब..
आलो.. 
कोण आहे हा.. ? आणि मला का बोलावतोय.. ?
त्रास आहे नुसता.. 
मला का पळवतोय आणि.. 
अरे थांब.. कुठे पळतोय.. वेड्यासारखा ..
अरे थांब...
थांब जरा ...
ऐकशील का जरा .. कुठे चालला. .
अरे थांब.. 
दम लागलाय मला.. तुझ्यामागे पळून.. थांब.. जरा श्वास तर घेऊ दे..
थांब ... जरा थांब..
हो येतोय.. गाठतोच थांब तुला आता ...
किती जोरात पळशील.. आलोच थांब.. 
गाठलंच आता तुला.. अगदी थोडे अंतर.. 
अरे का पळतोस ते तर सांगशील का.. ?
पकडतोच तुला.. 
जोरात .. जोरात .. आणखी जोरात.. 
आलाच हातात ..जवळ 
अगदी जवळ ..
आणखी जवळ .. 
अरे हा तर माझ्यासारखाच दिसतोय..
हुबेबुब माझ्यासारखा ... 
पळतोय..
आणि थांबत का नाहीये.. .
कुठे चालला आहे.. ?
धावतोय.. .
कोण आहे तू.. 
थांब तुला पकडणारच आता...
जोरात ..जोरात .
आणखी जोरात ...
मी धावतोय 
तो धावतोय..
तो धावतोय..
मी धावतोय..
मी धावतोय.. 
अरे कुठे गेला ..?
आता तर समोर होता. 
कुठे गेला ..?
अरे थांब.. अरे थांब..
कोण थांबणार आहे आता.. 
मी धावतोय.. 
जोरात ..जोरात 
आणखी जोरात.. 
मी धावतोय.. 
धावतोय. .
का. ?
कुठे.. ?
मी धावतोय.. 
धावतोय. .

1 comment: