Tuesday, February 14, 2012

मी.. आणि माझ्या भोवतालाच जग..; जग...आणि त्यातला मी..

शब्द इकडचा तिकडे केला तर केवढा अर्थ बदलतो... 

मी.. आणि माझ्या भोवतालाच जग..
यात मी केंद्रबिंदू आहे.. मला जे दिसतं, जाणवतं ते जग आणि ती माणसं..माझ्या असण्यावारती, माझ्या जाणीवांवरती हे जग 'जगतय'...यात माझ्या असण्याला सर्वाधिक महत्व आहे. जगाचं अस्तित्व माझ्या अस्तित्वाशी एकरूप झालंय.. मी आहे तर जग आहे.. नाहीतर नाही.. .
जग आणि त्यातला मी..
या प्रचंड रहाटगाडग्यातला करोडो जीवांमधला एक .. देऊळ मध्ये प्रभावळकर म्हणतात त्याप्रमाणे काळाच्या पाठीवरचा एक छोटा ठिपका.!! यात माझे अस्तित्व जगाच्या अस्तित्वाशी एकरूप झालंय.. माझ्या असण्या-नसण्याचा फारसा काही फरक पडत नाही.. 
एक आहे microscopic दृष्टी ...दुसरी आहे macroscopic दृष्टी
एक आत्मकेंद्रित तर दुसरी वैश्विक..

No comments:

Post a Comment