मराठी वर्तमानपत्रामध्ये जर कधी टेनिस किंवा badminton च्या बातम्या वाचत असताल तर हा शब्द नक्की वाचला असेल.. टाळता येण्यासारख्या चुका .. आजच्या सामन्यात सायना नेहवालकडून टाळता येण्यासारख्या ७ चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेऊन कुठल्यातरी सांग कि चू ने तिचा सरळ सेट्स मध्ये पराभव केला...
मस्त आहे शब्द.. टाळता येण्यासारख्या चुका..मला तर खूप आवडला ..
टाळता येण्यासारख्या चुका.. टाळल्या तर सामना जिंकता येईल आणि बऱ्याच गोष्टी सोप्या होतील नाही का..
माझ्या आहेत का अशा टाळता येण्यासारख्या चुका.. आहेतच की ..बऱ्याच आहेत ..
जसं की ..
असतील काही लोक बिनडोक, तरीही माज करणारे....म्हणून काय त्यांना सगळ्यांसमोर बिनडोक म्हणायचे. आमच्या अशाच एका बिनडोक मास्तरांना मी असाच सगळ्यांसमोर बिनडोक म्हणलो.. झालं.. पुढची दोन वर्ष त्या बिनडोकनी त्याचं नसलेलं सगळ डोक मला त्रास देण्यात लावलं.. आता होती का अशी नको तिथे स्पष्टवक्तेपणा दाखवण्याची गरज.. टाळता येण्यासारखीच गोष्ट होती.. नाही का.. (पण अजूनही मी याला चूक नाही म्हणत, बिनडोकचं होता तो.. )
ही एक गोष्ट झाली अशा आणखीही आहेत..न टाळलेल्या..
पण आणखीही आहेत ... आतापर्यंत टाळलेल्या..
जसं की
उगाच कधीतरी वाटत, गाडीचा स्पीडोमीटर तुटेल एवढ्या स्पीडनी गाडी चालवावी.. अगदी रोडरेज गेम सारख सुसाट निघावं
दर पाच मिनिटाला स्टेटस अपडेट मागायला येणाऱ्या manager चं डोक पकडून monitor वर आपटाव आणि म्हणावं घे अपडेट आता
लोकांना गाडीखाली चिरडून अजून बिनबोभाट फिरणाऱ्या हरामखोरांना गाडीखाली चिरडावे ..आणि कोर्टाला म्हणावं तुम्ही यांना ६ महिने शिक्षा दिली होती ना..आता मला पण ६ महिने शिक्षा द्या .. पण यांना मी चिरडणारच
माझ्या क्यूबमेटनी मला कित्येकदा मुठ किंवा डोक डेस्कवर आपटताना बघितले असेलच.. ते जेव्हा टाळता येण्यासारख्या चुका करतो तेव्हाच ..
असो..
अशा सर्वच गोष्टी मी सर्वाना सांगायला लागलो तर ती पण टाळता येण्यासारख्या चुक होईल . .
नाही का.. ?
माझ्या बरोबर पण अश्या टाळता येण्यासारख्या चुका भरपूर झाल्यात....
ReplyDeleteखास करून ति बिनडोक वाली सारखीच एक घटना घडलीये...:p
What is the probability that a casino would make the - JT Hub
ReplyDeleteThe probability that a casino would make 울산광역 출장마사지 the When you use 제주 출장마사지 the probability that a casino 여주 출장안마 would make the 구미 출장샵 jackpot a lot higher than expected, 광양 출장마사지 the