Monday, October 10, 2011

शब्द

शब्द
अव्यक्त भावनांना मूर्त रूप देणारे शब्द..
आनंददायी शब्द...
हवेहवेसे वाटणारे शब्द ..
डोळ्यांनी बोलणाऱ्या प्रेमी जीवांना ओझं वाटणारे शब्द...
तर कधी दुखावणारे शब्द..
आयुष्यभर टोचणी लावणारे शब्द..
बेहोष करणारे शब्द...
स्फूर्ती देणारे शब्द...
कधी मनांना जोडणारे शब्द तर
कधी दुरावा निर्माण करणारे शब्द..
शब्द...


No comments:

Post a Comment