Monday, February 6, 2012

टाळता येण्यासारख्या चुका

मराठी वर्तमानपत्रामध्ये जर कधी टेनिस किंवा badminton च्या बातम्या वाचत असताल तर हा शब्द नक्की वाचला असेल.. टाळता येण्यासारख्या चुका .. आजच्या सामन्यात सायना नेहवालकडून टाळता येण्यासारख्या चुका झाल्या आणि त्याचा फायदा घेऊन कुठल्यातरी सांग कि चू ने तिचा सरळ सेट्स मध्ये पराभव केला...
मस्त आहे शब्द.. टाळता येण्यासारख्या चुका..मला तर खूप आवडला ..

टाळता येण्यासारख्या चुका.. टाळल्या तर सामना जिंकता येईल आणि बऱ्याच गोष्टी सोप्या होतील नाही का..

माझ्या आहेत का अशा टाळता येण्यासारख्या चुका..  आहेतच की ..बऱ्याच आहेत ..
जसं की ..

असतील काही लोक बिनडोक, तरीही माज करणारे....म्हणून  काय त्यांना सगळ्यांसमोर बिनडोक म्हणायचे. आमच्या अशाच एका बिनडोक मास्तरांना मी असाच सगळ्यांसमोर  बिनडोक म्हणलो.. झालं.. पुढची दोन वर्ष त्या बिनडोकनी त्याचं नसलेलं सगळ डोक मला त्रास देण्यात लावलं.. आता होती का अशी नको तिथे स्पष्टवक्तेपणा दाखवण्याची गरज.. टाळता येण्यासारखीच गोष्ट होती.. नाही का..  (पण अजूनही मी याला चूक नाही म्हणत, बिनडोकचं होता तो.. )
ही एक गोष्ट झाली अशा आणखीही आहेत.. टाळलेल्या..

पण आणखीही आहेत ... आतापर्यंत टाळलेल्या..
जसं की
उगाच कधीतरी वाटत, गाडीचा स्पीडोमीटर तुटेल एवढ्या स्पीडनी गाडी चालवावी.. अगदी रोडरेज गेम सारख सुसाट निघावं

दर पाच मिनिटाला स्टेटस अपडेट मागायला येणाऱ्या manager चं डोक पकडून monitor वर आपटाव आणि म्हणावं घे अपडेट आता

लोकांना गाडीखाली चिरडून अजून बिनबोभाट फिरणाऱ्या हरामखोरांना गाडीखाली चिरडावे ..आणि कोर्टाला म्हणावं तुम्ही यांना महिने शिक्षा दिली होती ना..आता मला पण महिने शिक्षा द्या .. पण यांना मी चिरडणारच

माझ्या क्यूबमेटनी मला कित्येकदा मुठ किंवा डोक डेस्कवर आपटताना बघितले असेलच.. ते जेव्हा टाळता येण्यासारख्या चुका करतो तेव्हाच ..

असो..
अशा सर्वच गोष्टी मी सर्वाना सांगायला लागलो तर ती पण टाळता येण्यासारख्या चुक होईल . .
नाही का.. ?

Somewhere.... Everywhere.....Nowhere..

काहीतरी गडबड आहे, काहीतरी चुकतंय.. काय कळत नाहीये..
नोकरी बदलली
काम बदललं
आजुबाजुचे लोक बदलले.. 
घर पण बदललं.. 
पण काहीच नाही बदललं.. ..
काहीतरी चुकतंय..
एक तारखेला जमा होणाऱ्या पगारात काही हजार जास्त जमा होतायेत.. 
पण.. 
काहीतरी चुकतंय..
काहीतरी खुणावतंय.. 
काय.. ?
नीटसं दिसत नाहीये..
कोणीतरी आहे वाटत तिथे.. ओळखू येत नाहीये.. 
बोलावतोय का तो मला..
हात दाखवतोय वाटत .. हो मला बोलावतोय..
हो आलो...
अरे थांब कुठे निघालास..येतोय मी..
हो आलो...
अरे थांब कुठे निघालास..येतोय मी..
पळू नकोस ... थांब थांब..
आलो.. 
कोण आहे हा.. ? आणि मला का बोलावतोय.. ?
त्रास आहे नुसता.. 
मला का पळवतोय आणि.. 
अरे थांब.. कुठे पळतोय.. वेड्यासारखा ..
अरे थांब...
थांब जरा ...
ऐकशील का जरा .. कुठे चालला. .
अरे थांब.. 
दम लागलाय मला.. तुझ्यामागे पळून.. थांब.. जरा श्वास तर घेऊ दे..
थांब ... जरा थांब..
हो येतोय.. गाठतोच थांब तुला आता ...
किती जोरात पळशील.. आलोच थांब.. 
गाठलंच आता तुला.. अगदी थोडे अंतर.. 
अरे का पळतोस ते तर सांगशील का.. ?
पकडतोच तुला.. 
जोरात .. जोरात .. आणखी जोरात.. 
आलाच हातात ..जवळ 
अगदी जवळ ..
आणखी जवळ .. 
अरे हा तर माझ्यासारखाच दिसतोय..
हुबेबुब माझ्यासारखा ... 
पळतोय..
आणि थांबत का नाहीये.. .
कुठे चालला आहे.. ?
धावतोय.. .
कोण आहे तू.. 
थांब तुला पकडणारच आता...
जोरात ..जोरात .
आणखी जोरात ...
मी धावतोय 
तो धावतोय..
तो धावतोय..
मी धावतोय..
मी धावतोय.. 
अरे कुठे गेला ..?
आता तर समोर होता. 
कुठे गेला ..?
अरे थांब.. अरे थांब..
कोण थांबणार आहे आता.. 
मी धावतोय.. 
जोरात ..जोरात 
आणखी जोरात.. 
मी धावतोय.. 
धावतोय. .
का. ?
कुठे.. ?
मी धावतोय.. 
धावतोय. .