Monday, March 5, 2012

शब्दांगण - १

काही शब्दांविषयी.. काही शब्द हट के असतात.. विचार करायला लावतात..अशा काही शब्दांविषयी

कृष्णकृत्य -
कृष्णकृत्य म्हणजे वाईट कृत्य. फसवाफसवीची कामं. कृष्णचरित्र बघितलं तर त्यात अशी फसवाफसवीची कामं आहेत, पण त्यापेक्षा कितीतरी कामं रुढार्थानी आपण ज्याला धर्म म्हणतो अशी आहेत. असं असताना सर्व कपटी कृत्यांना कृष्णकृत्य म्हणून आपण चुकत आहोत असं मला वाटतं
अनुप जलोटाचं ते भजन ऐकलय का "जग में सुन्दर हैं दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम" यात दुसरी कुठलीही नाव टाकून बघा तो गोडवा येणं अवघड आहे..तसंच "केशवा, माधव तुझ्या नामात रे गोडवा" बाबत पण म्हणता येईल
कृष्णाच्या छल-कपटामागे असलेला उद्दात दृष्टीकोन सहज लक्षात येणारा नाहीये. म्हणून उगाच हा शब्द वापरताना आपण पूर्ण अर्थ समजून घेतला पाहिजे

मतदान - 
याचा पर्यायी इंग्रजी शब्द आहे - "Voting"
त्यात कुठेही "दानाचा" उल्लेख नाहीये. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये मतदान हा शब्द आहे
मला असं वाटतं की आपण उगीच "दान" म्हणून या कर्तव्याला ऐच्छिक केलंय. दान म्हणले की देणाऱ्याला दातृत्वाचा भाव येतो, आणि तो दान देतोय म्हणजे ते घेणाऱ्यावर उपकार करतोय अशी भावना होण्याची शक्यता आहे, नव्हे बहुतांश वेळा अशी भावना होतेच. पण मतदानाच्या बाबतीत मत"दान" करून आपण स्वत: वर उपकार करत आहोत. निवडून येणारा उमेदवार चांगला नसेल तर सर्वात जास्त त्रास आपल्यालाच होणार असतो. त्यामुळे ते दान नव्हे. ते कर्तव्य आहे

प्रेमात पडणं - 
याचा पर्यायी इंग्रजी शब्द आहे - Fall in love
आणि हिंदी शब्द आहे - "प्यार हुआ" - "प्यार में गिरा" नसतं हिंदीत!!
आता इंग्रजीच्या "Fall in love" चं मराठीत "प्रेमात पडणं" झालंय असं सरळ सरळ दिसतंय
पण इथे असं नाही वाटत का की "पडणं" (धडपडणं) क्रमप्राप्तच आहे. शब्दातच आहे ते.. :)

1 comment:

  1. कृष्णकृत्य - I think ithe krushna ha vyakti mhanun nahi aahe.
    baryach wela krushna ya shabda cha aartha 'kala' 'Black' asa asato.
    कृष्णकृत्य mhanaje kala kam - wait kam.
    Its not related to Bhagwan Krushna

    One more example of such usage is कृष्णविवर means blackhole

    ReplyDelete