 |
(हा ब्लॉग मुद्दाम मराठीत लिहत आहे, कारण मोगरा फ़क्त "मोगराच" असू शकतो, जस्मिन हा शब्द मोगर्यासमोर समोर अगदीच तोकडा वाटतो )
एक अभि-"यांत्रिकी" पदवीधर असल्यामुळे, मी दिवस-रात्र यंत्राबरोबर काम करतो असतो, अणि ते यंत्र आहे, संगणक. अणि काय काम करतो तर म्हणे, "Automation, Integration, Value-addition"...बरेच जड शब्द .... म्हणजे आणखी यांत्रिकीकरण!!! |
चोवीसपैकी बारा तास यंत्रांसमोर घालवल्यावर निसर्गातील अगदी साध्या (वाटणाऱ्या परंतु नसणाऱ्या) गोष्टींचे सुद्धा अप्रुप्र वाटतं, आणि तसंच काहीतरी मोगर्याबरोबर झालं. रोजचे साधारणपणे एकटाकी काम आणि त्यासारखाच यांत्रिक(वाटणारा पण नसणारा) प्रवासात एकदा मोगर्यानी माझं लक्ष वेधून घेतलं. ऑफीसपासून बस stop पर्यंत जाताना मी तीन सिग्नल ओलांडतो. कर्कश होर्न आणि लढायला निघालेल्या गाड्यांना मी बहुतेक वेळा नावं ठेवतंच असतो. अशाच एका सिग्नलवर नावं ठेवतं असताना, त्या धुरात एका मंद सुगंधानी माझं लक्ष वेधून घेतलं. तो मोगरा होता... गाड्यांच्या गर्दीत कुठे तरी गजरेवाला होता, मी त्याला पाहू शकत नव्हतो, पण सुगंध माझ्यापर्यंत पोहचला होता..
हळूहळू तो गाड्यांच्या गर्दीतून बाहेर आला आणि मोगर्याचा सुगंध आणखी पसरला. अर्थात, मी काही गजरा खरेदी करणार नव्हतो, तरी त्या मोगर्याकडे बघून एक छान हसू मात्र उमटलं.. आता रोज सिग्नल क्रॉस करताना मी मोगरा
शोधत असतो..
असंच पुन्हा केव्हा तरी गुलमोहर आणि उडळ विषयी... उन्हाळ्यात लालबुंद बहरलेला गुलमोहर आणि हिवाळ्यात गुलाबी फुलांनी डवरलेला उडळ, कधी जाणवला नसेल तर जरूर बघा, त्यांच्या कडे बघून सुद्धा हसू नक्की उमटेल. :)
ता. क. यात काही शुद्धलेखनाच्या चुका आहेत, पण मी कितीही प्रयत्न केला तरी, मला Google Transliterate वर बरोबर जोडाक्षर टाइप करता येत नव्हती..:( |
यंत्राबरोबर काम करताना निसर्गाच्या सानिध्यात असण्याची खूप गरज आहे..... कारण निसर्गाच्या सानिध्यात मनाला एक वेगळेच सुख मिळते. निदान आठवड्यातून एकदा निसर्गाबरोबर वेळ घालवायला काहीच हरकत नाही........:D
ReplyDeletekhup chan ....Mogrycha shod chalu thew ;)
ReplyDelete