Tuesday, March 13, 2012

नवीन येणाऱ्या ब्लॉग्सची झलक

हे काही नवे ब्लॉग्स. लवकरच या सर्वाना डोक्यातून कागदावर (ब्लॉगरवर) उतरवायला वेळ मिळेल अशी अशा आहे.

·         First encounter with "Probability" - I did not believe that probability was a science and did not consider it worth learning.
·         गुलमोहोर बहरतोय
·         शब्दांगण - : चतुर्भुज, कृष्णविवर, गद्धेपंचविशी
·         शब्दांगण - - हडपसर, धनकवडी, Better half
·         सखी - चार-पाच महिन्याच्या दुराव्यानं आपला स्नेह कमी होणार नाहीये
·         [Name not yet decided] - Two mathematics professors are discussing about probabilities of various things possible in life.
·         आणि लोटलीकर "लोटलीला" जातात तेव्हा: पुण्यात राहून मराठी येणं जितकं लाजीरवाण तितकंच "लोटलीकर" नाव असून कोकणी येणं..(पण नावाने जरी मी लोटलीकर असलो, तरी पुणेच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी; अर्थात ही काही कोकणी येण्याची पळवाट नाहीये). कोकणी, मारवाडी, गुजराती या सर्व भाषा मला बऱ्यापैकी समजतात. आणि तोडकंमोडकं का होईना पण थोड्या फार बोलता येतात, आज उद्या त्या पूर्ण येतीलच - म्हणून हा पहिला कोकणी ब्लॉग
·         खरेदी

नावात काय आहे?

रस्त्यात लावलेल्या जाहिराती वाचण्याची माझी जुनीच सवय आहे. गेले कित्येक दिवस मी घर ते ऑफिस प्रवास करताना बांधकाम व्यावसायिकांच्या (बिल्डरच्या) जाहिराती बघतोय. सगळी नावं एकजात इंग्रजी. सगळ्यांना इंग्रजी कुत्रा चावलाय वाटतं. काय ती नावं - Swiss county, Aspiria, Mega Polis, Life Republic, Dynasty, Island, Servillie, Sovereign  - सगळाच मूर्खपणा

 

ज्या इमारतीत पाटील, जोशी, कांबळे, शर्मा, देसाई, रेड्डी, नायडू, सिंग, पटेल, खान, जेकब, जोसेफ या नावांची भारतीय मंडळी राहणार त्यांच्या इमारतीचं नाव काय तर म्हणे Eden paradise. सगळीच बौद्धिक दिवाळखोरीची लक्षणं

इंग्रजी नावांना माझा काही तात्विक विरोध नाहीये, पण शंभर नव्या इमारतींपैकी नव्वदना जर आपण इंग्रजी नावं देत असू, तर हे भारतातलं शहर आहे का इंग्लंडमधलं हा प्रश्न पडतो

 

कंपन्या वैगेरे इंग्रजी नावं ठेवतात ते समजू शकतो एखाद्या वेळेस, कारण त्यांना जगभर आपला धंदा करायचा असतो, पण घरांची नावं, ती पण इंग्रजी. उद्या पोरांची नावं पण Tom, Dick and Harry ठेवतील

देव करो आणि या भारतीय इंग्रजांना सुबुद्धी होवो...!!!

 

(टीप: आणि नाहीच झाली तर मग शिवसेना, मनसे आहेतच!!)