Thursday, March 15, 2012

अपघात

डावा डोळा प्रचंड ठणकतोयउघडत नाहीयेत्याच्या खालचा भाग काळानिळा झालाय..

तिथंच बाजूला थोडसं खरचटलयंतिथून रक्त येतंय..

एवढे दिवस मेंटेन केलेला फ्रेंचकट रक्तानं लाल झालाय..

नाकातून रक्त वाहतंय...

आणि मी हे बघत आरशासमोर उभा आहे... 

 

दोन-तीन तासांपूर्वी जर मला कुणी सांगितलं असतं कि माझं असं काही होणार आहे तर मी त्याला वेड्यात काढलं असतं...

 

****

 

जेवण झाल्यावर मी म्हणलं मला झाडाझडती वाचून पूर्ण करायचं आहे, मी जातो जुन्या घरी. उद्या सकाळी परत येईन. दहा-साडेदहाला जुन्या घरी आल्यानंतर मी विश्वास पाटलांची झाडाझडती घेऊन बसलो. एवढी म्हणावी तेवढी जमली नाहीये कादंबरी, पण म्हणलं अर्ध्यापर्यंत आलोच आहे तर पूर्णच करावी. आणि वाचू लागलो. साडेअकरा पर्यंत मी नक्की जागा होतो कारण तेव्हा घड्याळ पाहिलं होतं, वाचत कधी झोपलो ते मात्र माहित नाही

 

आणि नंतर उठलो ते असं विचित्रपणे....

 

बऱ्याचदा स्वप्नात काय पाहतोय ते मला आठवतं.. 

जसं की, भूज मध्ये भूकंप झाला होता तेव्हा उगाच बेड हलतोय असं स्वप्न पडलंय.. किंवा

एस्सेल वर्ल्डला जाऊन आल्यावर झोपेत सुद्धा झोक्यात बसलोय असं फिरणं ...

मी पुणे महानगरपालिकेचा आयुक्त आहे आणि "स्वच्छ पुणे सुंदर पुणे" सत्यात उतरलंय.. शहर व्यवस्थापन कसं करावं यासाठी माझा सल्ला जगभरातले महापौर विचारतायेतं..किंवा

सिंहगडावर त्या माझ्या फेवरेट दगडावर बसलोय आणि रिमझिम पाऊस पडतोय आणि माझ्या बरोबर ... असो.. विषयांतर नको.. 

 

तर स्वप्नात काय बघत होतो हे मला बहुतेक वेळा आठवतं ..पण आज  काय झालं कोणास ठाऊक ..

 

मी दचकून उठलो.. 

उठून एकदम उभं राहण्याचा प्रयत्न केला.. 

अंगावर घेतलेल्या चादरीचा पायात गुंता झाला होता..

उभा राहतोय न राहतोय तर त्या चादरीमुळे मी पडलो.. 

सरळ जाऊन बेडच्या लोखंडी किनारीवर आदळलो.. 

डावा डोळा त्या किनारीवर आपटला होता... 

हे सर्व व्हायला एक सेकंदही लागला नसेल ..

पूर्ण चेहरा ठणकतोय.. 

डोळे उघडत नाहीये..

घरात कोणीही नाही.. 

अजून माझी झोप पुरती उडाली नव्हती ..

काय झालंय हे कळायच्या आतच सर्व काही झालं होतं..

मी तसाच जाऊन डायनिंग टेबल वर (म्हणजे खुर्चीवर) बसलो..

डोकं टेकवलं समोरच्या काचेवर .. 

किती वेळ बसलो माहित नाही...

****

 

थोड्या वेळानी उठून आरशासमोर उभा राहिलो तर.. 

वर्णन सुरुवातीलाच केलंच आहे.. 

 

****

 

हसावं का रडावं ...

लागलाय तर प्रचंड..

पण काय झालं तर म्हणे झोपेत पडलो..!! 

एवढं दुखत असताना पण मला हसू येत होतं...

एकतर डोळा उघडत नव्हता ...

त्यात माझा चष्मा जगावेगळा ...

डाव्या डोळ्याला शून्य नंबर.. 

आणि उजव्याला भला मोठा..

आणि डावा डोळा उघडत नाहीये..  

म्हणलं आता काही खरं नाही..

बाबांना फोन करावा तर रात्रीचे अडीच वाजतायेत.. 

तसाच पडून राहिलो...

कधी झोपलो आठवत नाही...

सकाळी उठलो. कसातरी डोळा उघडला.. 

डोळा प्रचंड ठणकतोय..

दिसतंय.. सर्व दिसतंय.. सुदैव माझं...

 

****

बाबांना फोन केला..

ते आले.. 

डॉक्टरकडे गेलो..त्यानी तपासलं... 

आणि म्हणाला .. "You are saved, vision is not damaged" 

"आणखी काही दिवस डोळा दुखेल, पण काळजी करायचं काही कारण नाही"

 

****

 

ऑफिसमध्ये फोन करून झाला प्रकार सांगीतला.. आणि म्हणलं उशीर होईल.. 

साडेतीनला ऑफिसमध्ये गेलो तर सगळ्यांना झाला प्रकार परत ऐकायचा होता.. आणि मी झोपेत पडतो हे ऐकून हसायचं होतं..

झाला प्रकार सांगून मी पण त्याच्या बरोबर हसत होतो...

 

****

 

पण एक प्रश्नाचं उत्तर मला अजून मिळालं नाहीये.. असं काय बघितले मी झोपेत की उठून उभा राहिलो...

 

****

जाता जाता तळटीप: इंग्रजीमध्ये म्हणतात "I met with an accident" मस्त आहे ना.. "Accident".. एक व्यक्ती आहे आणि आपण मी त्याला भेटलो..!! 

4 comments:

  1. bapre! tu zopet chaltos ki kay? kalaji ghe re. asa uthat nako jaus ekdam :)
    mulat tu swapnach baghat nako jaus jast :D

    ReplyDelete
    Replies
    1. A Disclaimer for everyone: I don't sleep-walk!

      Delete
  2. Ha ha Ha... Te Bhari Hota Met With Accident...........:p
    Awadla Khup....

    ReplyDelete