रस्त्यात लावलेल्या जाहिराती वाचण्याची माझी जुनीच सवय आहे. गेले कित्येक दिवस मी घर ते ऑफिस प्रवास करताना बांधकाम व्यावसायिकांच्या (बिल्डरच्या) जाहिराती बघतोय. सगळी नावं एकजात इंग्रजी. सगळ्यांना इंग्रजी कुत्रा चावलाय वाटतं. काय ती नावं - Swiss county, Aspiria, Mega Polis, Life Republic, Dynasty, Island, Servillie, Sovereign - सगळाच मूर्खपणा.
ज्या इमारतीत पाटील, जोशी, कांबळे, शर्मा, देसाई, रेड्डी, नायडू, सिंग, पटेल, खान, जेकब, जोसेफ या नावांची भारतीय मंडळी राहणार त्यांच्या इमारतीचं नाव काय तर म्हणे Eden paradise. सगळीच बौद्धिक दिवाळखोरीची लक्षणं.
इंग्रजी नावांना माझा काही तात्विक विरोध नाहीये, पण शंभर नव्या इमारतींपैकी नव्वदना जर आपण इंग्रजी नावं देत असू, तर हे भारतातलं शहर आहे का इंग्लंडमधलं हा प्रश्न पडतो.
कंपन्या वैगेरे इंग्रजी नावं ठेवतात ते समजू शकतो एखाद्या वेळेस, कारण त्यांना जगभर आपला धंदा करायचा असतो, पण घरांची नावं, ती पण इंग्रजी. उद्या पोरांची नावं पण Tom, Dick and Harry ठेवतील.
देव करो आणि या भारतीय इंग्रजांना सुबुद्धी होवो...!!!
(टीप: आणि नाहीच झाली तर मग शिवसेना, मनसे आहेतच!!)
मनसे अजून इमारतींच्या नावाबद्दल तरी भडकली नाहीये... त्याची वाट पहावी लागेल...
ReplyDeleteभाऊ आता तेही पुर्ण झालं. वाट नाही बघावी लागली जास्त. मनसेने गुजराती नावं असलेल्या इमारतींच्या मालकांना चांगलंच घेतलं.
Delete