कर्णावरच्या राधेय या कादंबरीतील काही वाक्यं..
****
नाही तरी जीवन या नावेसारखेच असते. जीवनप्रवाहावर केव्हारती एक नाव सोडली जाते. ऋणानुबंधाचीदोन दुबळी वळी हाती दिली जातात. अहंकाराचे शीड उभारलेले असते. पण तेवढ्यावर थोडाच पैलतीर गाठला जातो? अनुकूल दैवाचे वारे लाभले तरच पैलतीर गाठता येतो, नाही तर प्रवाहपतित होऊन त्या लाटेवर डोलत राहण्याखेरीज काहीही उरत नाही.
****
मी योद्धा आहे. जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबर सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यश सामावलं आहे.
****
No comments:
Post a Comment