पाऊस!! पावसाचा आणि माझा एकमेकांशी संबंध तरी किती, एक सोपा निबंधाचा विषय म्हणून, काही प्रसिद्ध कवितांचा विषय म्हणून, वाफाळलेल्या चहाबरोबर - गप्पा मारत खाल्लेल्या भज्यांचा सोबती म्हणून का ओल्याचिंब नायिकेला न्याहाळताना दुर्लीक्षिलेला म्हणून.. शहरात जन्मलेल्या मला आणि माझ्यासारख्या बहुसंख्य जणांना पाऊस भेटतो तो फक्त असाच. त्याचे माझ्या आयुष्यातील महत्त्व ते किती - नगण्य, कारण तो नाही आला तरी माझ्या आयुष्यात काही फार मोठा फरक पडणार नसतो. परंतु शेतकऱ्याचा आयुष्यात....... तिथे मात्र हा आपला प्रेमळ शहरी मित्र, एका कधीही न सुटणाऱ्या यक्ष प्रश्नाच्या रुपात समोर येतो.
गाभ्रीचा पाऊस हा असाच एका शेतकऱ्याचा, त्याच्या आणि पावसाच्या लपंडावाचा, त्याच्या कुटुंबाच्या प्रतिक्रियांचा चित्रपट आहे. या चित्रपटाला विदर्भात होणाऱ्या आत्महत्यांची पार्श्वभूमी आहे. चित्रपट सुरु होतो, तोच मुळी एका आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा घरात. नायिका मृत व्यक्तीच्या पत्नीचे सांत्वन करण्याचा प्रयत्न करत आहे, पण खरेतर तीच मनातून खचली आहे, कदाचित माझा पतीपण!! नायिका हि चिंता आपल्या सासूला सांगते, आणि मग सुरु होतं नायिकेचे कायम आपल्या पतीवर लक्ष ठेवणं. तिचे कायम आपल्या मुलाला त्याच्यासोबत पाठवणं, उधारीने खरेदी करून त्याला पुरणपोळी करून खायला घालण, आणि अशाच काही प्रकारे आपला पती कायम आनंदात राहील याचा प्रयत्न करणं. चित्रपटाच्या एका दृश्यात या दाम्पत्याचा मुलगा मयतीवर फेकेलेले एक रुपयाचे नाणं उचलतो, आणि नायक त्याला फटकावून ते फेकून देतो. नायिका सर्व प्रकारे आपल्या नायकाला मदत करण्याच्या प्रयत्नात असताना, नायक मात्र एका विवंचनेत पुरता फसलेलो असतो. तो कधी टीवीवर पावसाचे अंदाज बघत असतो, कधी शेतावर पेरणी करण्यासाठी बैल कुठे भाड्याने मिळतात का ते शोधात असतो, कधी त्याला बियाण्यासाठी लागणारे पैसे कुठून येणार याची चिंता असते, तर कधी मोटार लावून पाणी खेचण्यासाठी वीज कधी येणार याची काळजी असते. ग्रामीण जीवनाच्या दाहक वास्तवतेला स्पर्श करत चित्रपट पुढे सरकतो. आणि चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये आपल्याला दिसतं मयतीवर फेकेलेले एक नाणं. अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवून चित्रपट संपतो.
एखाद्या सामाजिक विषयाबद्दल जन- जागृती करण्यासाठी चित्रपट या माध्यमाचा किती प्रभावीपणे उपयोग करता येतो याचा प्रत्यय चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये येतो. गाभ्रीचा पाऊस या चित्रपटाने एका अत्यंत गंभीर विषयाला वाचा फोडली आहे. कलेचा अविष्कार हा फक्त औट घटकेच्या करमणुकीसाठी नसतो, हेच हा चित्रपट सांगत आहे.
आपल्या अन्नदात्याच्या, शेतकऱ्याच्या जीवनातले यक्ष प्रश्न चित्रपटाने आपल्याला विचारले आहेत. ते सोडवणे हि प्रशासनाबरोबरच आपलीही जवाबदारी आहे. मला माहित आहे, कि प्रत्येक जण प्रत्यक्षपणे जाऊन प्रश्न सोडवू शकणार नाही, परंतु ते समजून घेऊन, त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता तर नक्कीच करू शकतो. तेवढे कृतघ्न तर आपण नक्कीच नाही!!!

No comments:
Post a Comment